testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

‘होळी’ करा पण झाडांची नाही!

holi
वेबदुनिया|
भारतीय संस्कृतीत होळीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या दिवशी वाईट प्रवृत्तींचे दहन करण्याकरीता होळी पेटवली जाते. मात्र, असे करताना अनेक वृक्षांचा नाहक बळी दिला जातो. जगभरात पर्यावरण बचावासाठी प्रयत्न सुरू असतानाच होळीसाठी झाडांची सर्रासपणे कत्तल केली जाते. विशेष म्हणजे यंदा जागतिक वनदिनीच होळी साजरी होणार आहे. एकीकडे झाडे लावा, झाडे जगवा असा संदेश दिला जात असताना जागतिक वनदिनीच हजारो वृक्षांची कत्तल होणार आहे.
२१ मार्च जगभरात `वन दिवस` म्हणून साजरा केला जातो. गेल्या ३८ वर्षांपासून ही परंपरा कायम आहे. १९७१ साली युरोपीयन शेतीविषयक संघाच्या २३ व्या सर्वसाधारण सभेत जागतिक साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. पर्यावरणाचे महत्त्व सर्वसामान्यांपर्यंत पोहचावे, पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी झाडांचे काय महत्त्व आहे याची माहिती मिळावी असा उद्देश समोर ठेवून हा दिवस साजरा केला जात आहे.

पूर्वी वनदिवस साजरा करण्याची जबाबदारी जिल्हा परिषदेकडे होती. २००६-०७ साली हे कार्य सामाजिक वनीकरण विभागाकडे सोपविण्यात आले. त्यानुसार राज्यात ८,८८४ इको क्लब स्थापण्यात आले. शासकीय पातळीवर पर्यावरण बचावासाठी एवढे प्रयत्न होत असताना जागतिक वनदिनीच हजारों झाडांची कत्तल होण्याची नामुष्की यंदा आली आहे.
होळीसाठी झाडे तोडण्याऐवजी केरकचरा व अन्य टाकाऊ पदार्थांची होळी करावी असे आवाहन पर्यावरण प्रेमी करित आहेत. होळीच्या निमित्ताने पर्यावरणाची माहिती देण्याचे काम स्वयंसेवकांनी करावे तसेच दुर्गुणांच्या पुतळाची प्रतिकात्मक होळी करून हा साजरा करावा, असेही सांगितले जात आहे. जागतिक वनदिनी वनाचीच होळी होईल असे कोणतेही कृत्य होऊ नये यासाठी सर्वांनीच प्रयत्न करणे आवश्यक आहे.


यावर अधिक वाचा :

स्वप्नात जर घुबड दिसला तर...

national news
स्वप्नात जर घुबड दिसला तर शुभ मानले जात नाही. अशी मान्यता आहे की स्वप्नात जर घुबड दिसला ...

Totake : गुलाबाचे 9 चमत्कारिक टोटके

national news
गुलाब सर्वांना प्रिय फूल आहे. याचे अनेक फायदेही आहेत. पण या गुलाबाच्या फुलांचे काही टोटके ...

अक्षय तृतीयेला विवाह असल्यास राशीनुसार पूजा करावी!

national news
अक्षय तृतीया हा सण वैशाख शुद्ध तृतीयेला साजरा केला जातो. हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक आहे. ...

देवघरात नका ठेवू या मूरत्या

national news
वास्तूप्रमाणे घराच्या ईशान कोपर्या्त मंदिर प्रतिष्ठित केले पाहिजे. मंदिरात प्रतिष्ठित ...

अमावस्याला करा हे 6 सोपे उपाय

national news
अमावस्याला दक्षिणाभिमुख बसून मृत पूर्वजांसाठी पितृ तर्पण करा.

राशिभविष्य