बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 2 जुलै 2016 (10:37 IST)

ढाका: कमांडर ऑपरेशन संपुष्टात, बंधकांची सुटका

ढाका- बांगलादेशची राजधानी ढाका शहरातील गुलशन परिसरातील एका रेस्टॉरंटमध्ये बंदुकधारी दहशतवाद्यांनी ओलिस ठेवलेल्या 18 जणांची सुटका करण्यात आली आहे. तर, जवानांनी केलेल्या हल्ल्यात 6 दहशतवादी ठार झाले आहेत व एक दहशतवाद्यांला जीविंत पकडण्यात यश मिळाल्याची बातमी आहे.
 
ढाक्यातील होली आर्टिसन बेकरी या रेस्टॉरंटमध्ये दहशतवाद्यांच्या गोळीबारात दोन पोलिसांचा मृत्यू झाला. या हल्ल्याची जबाबदारी इस्लामिक स्टेट (इसिस) ने स्वीकारली आहे. 
 
शुक्रवारी रात्री साडेनऊच्या सुमारास दहशतवाद्यांनी रेस्टॉरंटमध्ये प्रवेश करुन धुमाकूळ घातला. या रेस्टॉरंटमध्ये प्रामुख्याने परदेशी नागरिकांचा वावर जास्त असतो. या परिसरातच अनेक देशांचे दुतावास असून येथे भारतीय दूतावासही आहे. भारतीय दुतावासातील सर्व कर्मचारी सुखरुप असून, भारतीय परराष्ट्र मंत्रालय परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.
 
सध्या सर्च ऑपरेशन चालू आहे.