गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By

जगभर जगतात बिनओळखीचे 1.1 अब्ज लोक

संपूर्ण जगभरात 1.1 अब्ज असे लोक आहेत, ज्यांची कोणतीही ओळख नाही आणि ‍अधिकृतरीत्या त्यांचे अस्तित्वही नाही. हे लोक कोणत्याही सरकारी रेकॉर्डमध्ये नोंद न होता जगत आहेत, असा धक्कादायक निष्कर्ष जागतिक बँकेने काढला आहे. या कारणामुळे जगातील लोकसंख्येच्या एका भागाला आरोग्य आणि‍ शिक्षणाच्या सुविधा मिळत नाहीत, असेही बँकेने म्हटले आहे. 
 
या अदृश्य लोकांमधील बहुसंख्यक लोक आफ्रिका आणि आशियात राहतात. त्यांच्यापैकी एक तृतीयांश लहान मुले असून त्यांची नोंदणीच झालेली नाही, असे विकासासाठी ओळख कार्यक्रम या जागतिक बँकेच्या कार्यक्रमाने म्हटले आहे. हा मुद्दा अनेक कारणांमुळे आहे, मात्र विकसनशील देशातील लोक आणि सरकारी सेवा यांच्यातील अंतर हे त्याचे प्रमुख कारण आहे, असे आयडी 4 डी कार्यक्रमाच्या व्यवस्थापिका वैजयंती देसाई यांनी सांगितले.
 
चीनसारख्या काही देशांमध्ये लोकांनी जाणूनबुजून आपल्या मुलांची नोंदणी केली नाही कारण एक मूल धोरणाच्या परिणामांची त्यांना भीती वाटत होती.