मंगळवार, 28 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 13 जुलै 2022 (12:33 IST)

आंदोलक पंतप्रधानांच्या निवासस्थानात घुसले, श्रीलंकेत आणीबाणी लागू

shrilanka
श्रीलंकेत आणीबाणी
 
श्रीलंकेत सुरू असलेल्या संकटाच्या पार्श्वभूमीवर मोठी बातमी समोर आली आहे. लोकांच्या गोंधळात देशात आणीबाणी लागू करण्यात आली आहे. राष्ट्रपतींनी देश सोडल्यानंतर हजारो लोक रस्त्यावर आले आणि पंतप्रधानांच्या निवासस्थानाकडे जाऊ लागले. त्यामुळे कोलंबोतील अमेरिकन दूतावास बंद करण्यात आला आहे.
 
श्रीलंकेत लोकांची निदर्शने सुरू आहेत
 
श्रीलंकेत लोकांची निदर्शने सुरू आहेत. हजारो लोक रस्त्यावर उतरून गोंधळ घालत आहेत. जमावाला नियंत्रित करण्यासाठी लष्कराने अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. आंदोलक पंतप्रधानांच्या निवासस्थानाकडे जात आहेत, तर लष्कर त्यांना रोखण्याचा प्रयत्न करत आहे.