testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

इंडोनेशियामध्ये 3 चर्चवर बॉम्बफेक ; 11 ठार

सुरबाया (इंडोनेशिया)| Last Modified सोमवार, 14 मे 2018 (08:10 IST)
इंडोनेशियात तीन चर्चच्या प्रार्थनेच्यावेळी झालेल्या आत्मघातकी बॉम्बस्फोटांमध्ये किमान 11 जण ठार झाले तर किमान डझनजण जखमी झाले आहेत. मोटरसायकलवरून आलेल्या या आत्मघातकी हल्लेखोरांमध्ये महिला आणि लहान मुलांचाही समावेश होता.
या बॉम्बस्फोटांपैकी पहिला हल्ला सुराबाया शहरातील सांता मारिया रोमन कॅथोलिक चर्चवर झाला. तेथील बॉम्बस्फोटामध्ये चौघेजण ठार झाले. यामध्ये एक हल्लेखोरही मारला गेला, असे पोलिस प्रवक्‍ते फ्रान्स बारुंग मान्गेरा यांनी वार्ताहरांना सांगितले. या स्फोटामध्ये एकूण 41 जण जखमी झाले. त्यामध्ये दोन पोलिस अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. या स्फोटानंतर काही मिनिटातच दिपोनेगोरो चर्चवर आणि त्यानंतर पान्तेकोस्ता चर्चवरही अशाचप्रकारे आत्मघातकी बॉम्बस्फोट झाले. हे बॉम्बस्फोट किमान 5 हल्लेखोरांनी घडवले होते. त्यामध्ये बुरखाधारी एका महिलेचाही समावेश होता. या महिलेबरोबर दोन लहान मुलेही होती. तिला दिपोनेगोरो चर्चच्या बाहेर अडवण्यात आले होते. मात्र तिने आत घुसून एका व्यक्‍तीला मिठी मारली आणि बॉम्बचा स्फोट झाला, असे एका सुरक्षा रक्षकाने सांगितले.
अध्यक्ष जोको विदोदो यांनी सुरबाया येथील घटनास्थळाला भेट दिली आणि परिस्थितीची पहाणी केली. अल्पसंख्यांक ख्रिश्‍चन समुदायाला लक्ष्य करण्यासाठी झालेल्या या हल्ल्यांचा अध्यक्षांनी निषेध केला आहे. 2000 साली ख्रिसमसच्या रात्री अशाच प्रकारे चर्चवर झालेल्या हल्ल्यांमध्ये 15 जण मरण पावले होते. तर 100 पेक्षा जास्त जण जखमी झाले होते.


यावर अधिक वाचा :

भाऊ कदमने दिला स्वच्छतेचा संदेश

national news
दिवाळीचा उत्साह सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे. दिव्यांची आरास आणि रांगोळीने सजलेल्या या ...

स्मार्टफोन्सच्या विक्रीत भारताने अमेरिकेला मागे टाकले

national news
स्मार्टफोनच्या बाजारपेठेत भारतानं अमेरिकेला मागे टाकत दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. जुलै ...

मराठा समाज आरक्षण : आयोगाचा अहवाल बुधवारी सादर होणार

national news
मराठा समाजाविषयीचा राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल बुधवारी किंवा गुरुवारी राज्य सरकारला ...

भारत आणि केनियामध्ये प्रसारमाध्यम साक्षरतेसाठी कार्यक्रम

national news
बीबीसीच्या ‘बियाँड फेक न्यूज’ या उपक्रमाची सुरुवात 12 नोव्हेंबर रोजी होत आहे. खोटी बातमी ...

मोबाईल मार्केटमध्ये मागे राहिल्या भारतीय कंपन्या, चिनी ...

national news
भारतीय मोबाइल मार्केटमध्ये पाच वर्षांपूर्वी 50 टक्क्यांहून अधिक शेअर्स असलेल्या स्वदेशी ...

भारताने प्रथम सामना 31 धावांनी जिंकून मालिकेत 1-0 अशी आघाडी ...

national news
भारत आणि ऑस्ट्रेलियात एडिलेडमध्ये खेळत असलेला पहिला सामना भारतीय संघाने 31 धावांनी जिंकून ...

स्वाभिमानी शेतकरी संघटना रस्त्यावर उतरणार

national news
सरकारने केवळ दुष्काळ जाहीर केला आहे. परंतु कोणत्याही उपाययोजना केल्या नाही. शेतकर्‍यांना ...

राज्यातील ३० टक्के लोकांना उच्चरक्तदाबाचा त्रास

national news
आरोग्य संचालनालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, राज्यात एकूण ८.८ लाख लोक हायपरटेंशनच्या ...

रस्त्यावर पडून असलेल्या वाहनांवर कार्यवाही

national news
मुंबईतील रस्त्यांवरील जुन्या तसेच वापरात नसलेल्या (पडून असलेल्या) वाहनांवर कार्यवाही ...

भाजपाची विचारधारा देशासाठी घातक : शरद पवार

national news
भाजपाची विचारधारा देशासाठी घातक आहे. भाजपाला सत्तेतून बाहेर काढण्यासाठी आघाडीचा प्रयोग ...

राज्यातील ३० टक्के लोकांना उच्चरक्तदाबाचा त्रास

national news
आरोग्य संचालनालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, राज्यात एकूण ८.८ लाख लोक हायपरटेंशनच्या ...

रस्त्यावर पडून असलेल्या वाहनांवर कार्यवाही

national news
मुंबईतील रस्त्यांवरील जुन्या तसेच वापरात नसलेल्या (पडून असलेल्या) वाहनांवर कार्यवाही ...

भाजपाची विचारधारा देशासाठी घातक : शरद पवार

national news
भाजपाची विचारधारा देशासाठी घातक आहे. भाजपाला सत्तेतून बाहेर काढण्यासाठी आघाडीचा प्रयोग ...

माथेरानच्या मिनी ट्रेनला जोडला एसी कोच

national news
माथेरानच्या मिनी ट्रेनला शनिवारपासून वातानुकूलित डबा जोडण्यात आला आहे. माथेरान थंड हवेचे ...

सारस्वत को-ऑपरेटिव्‍ह बँक ची व्हॉटसअप बँकिंग सेवा सुरू

national news
सारस्वत को-ऑपरेटिव्‍ह बँक आपल्‍या ग्राहकांसाठी नाविन्यपूर्ण डिजीटल सेवा प्रदान करणार आहे. ...