1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 10 मे 2018 (09:17 IST)

कुत्र्याला वाचवण्यासाठी काहीही ......

brazil first lady marcela
ब्राझिलचे राष्ट्रपती मिशेल तेमेर यांची पत्नी आणि फर्स्ट लेडी मार्सेला तेमेर यांनी आपल्या पाळीव कुत्र्याला वाचवण्यासाठी आपल्या जीवाची पर्वा न करता तलावात उडी घेतली.
 
या घटनेत मार्सेला आपल्या मुलासोबत राष्ट्रपती भवनातील बागेमध्ये फिरत होती. याच वेळी त्यांचा पाळीव कुत्रा पिकोलीने तलावात उडी घेतली, परंतु बाहेर येण्याचा प्रयत्न करता असताना तो बुडू लागला. आपला आवडता कुत्रा बुडताना पाहून राष्ट्रपतींच्या पत्नी मार्सेला यांनी राष्ट्रपती भवनाच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या सुरक्षा रक्षकांकडे धाव घेतली आणि कुत्र्याला वाचवण्यास सांगितले. परंतु त्यांनी नकार देताच मार्सेला यांनी स्वत: तलावात उडी घेतली आणि कुत्र्याचा जीव वाचवला. दरम्यान, ब्राझिलच्या फर्स्ट लेडीचा आदेश न मानणाऱ्या सुरक्षा रक्षकांना कामावरून काढून टाकण्यात आले आहे. राष्ट्रपतींच्या घरामध्ये दोन कुत्रे आहेत. यातील एकाचं नाव पिकोली आणि दुसऱ्याचे थोर असे आहे.