गुरूवार, 28 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 31 जानेवारी 2020 (09:39 IST)

गुगलची चीनमधील सर्व कार्यालये बंद

गुगलने चीनमधील आपली सर्व कार्यालये काही कालावधीसाठी बंद करण्याचा निर्णय घेतलाय. कोरोना विषाणूच्या प्रसारामुळे वाढता धोका लक्षात घेऊन कंपनीने सर्व कार्यालये तात्पुरती बंद करण्याची घोषणा केली आहे. गुगलची हाँगकाँग, तैवान आणि मेनलँड चाइनामधील सर्व कार्यालये बंद असणार आहेत.
 
कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी चीनमधील सरकारने नागरीकांना प्रवास टाळण्याचे आणि घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे. सरकारच्या सूचनेनुसार कंपनीने सर्व कार्यालये बंद करण्याचा निर्णय घेतल्याचं गुगलच्या प्रवक्त्याने The Verge सोबत बोलताना सांगितले. याशिवाय कर्मचाऱ्यांना १४ दिवस घरुन काम करण्याची मूभाही देण्यात आली आहे.