शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 4 जुलै 2018 (17:23 IST)

कश्मिरा अमेरिकेत ‘वाईंडरश ७०’ पुरास्काराने गौरव, ७० वर्षानंतर देशाबाहेरील व्यक्तीचा गौरव

अमेरिकेत आरोग्यसेवेत विशेष योगदान दिलेल्या बाहेरील देशातील सेवा भावी कर्मचाऱ्यांना ७० वर्षानंतर पहिल्यांदाच गौरविण्यात आले. त्यात मुळच्या नाशिकच्या असलेल्या कश्मिरा आंधळेंना प्रतिष्ठेच्या ‘वाईंडरश ७०’ या पुरस्काराने गौरव करण्यात आला आहे. विशेष म्हणजे ७० वर्षातील हा पहिलाच पुरस्कार मिळविण्याचा मान देखील त्यांना मिळाला आहे. नुकत्याच पार पडलेल्या या सोहळ्यात तेथील पंतप्रधान थेरेसा यांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला आहे. त्यामुळे त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
 
मुळच्या नाशिकच्या कॉलेजरोड येथे राहणाऱ्या कश्मिरा आंधळे या गेल्या पंधरा वर्षांपासून इंग्लंडमध्ये फिजिओथेरपिस्ट म्हणून अखंडपणे सेवा देत आहे. त्यांनी दिव्यांग बालकांपासून ते जर्जर ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्व प्रकारच्या अनेक रुग्णांवर यशस्वी उपचार केले आहे. या त्यांच्या विशेष कार्याचा पुरस्कारासाठी विचार करण्यात आला आहे. मुळच्या नाशिकच्या असलेल्या कश्मिरा यांचा गौरव भारतासाठी गौरवास्पद आहे. कश्मिरा आंधळे यांचे वडील ललित सांगळे हे वकील व आई मीना सांगळे या मुख्याध्यापिका आहे. त्यांचे पती निवृत्ती आंधळे हे अमेरीकेतील ईस्ट बर्कशायर येथे सॉफ्टवेअर इंजिनीअर तर त्यांचे दीर प्रकाश आंधळे हे आदिवासी विभागात सहाय्यक आयुक्त पदावर कार्यरत आहे.
 
अमरिकेत १९४८ मध्ये स्थापन झालेल्या एनएचएस या संस्थेच्या च्या ७० व्या वर्षपूर्तीनिमित्ताने युके सरकारच्या वतीने संस्था स्थापनेनंतर प्रथमच या पुरस्कार समारंभाचे आयोजन केले होते. अमेरिकेच्या वैद्यकीय क्षेत्रामध्ये सेवा देणाऱ्या बाहेरील देशातील दहा व्यक्तींची निवड यात करण्यात आली होती. त्यात गेल्या १५ वर्षापासून एनएचएस मध्ये फिजिओथेरपिस्ट म्हणून अखंडपणे सेवा देत असलेल्या कश्मिरा आंधळे यांचा प्रतिष्ठेच्या ‘वाईंडरश ७०’ या पुरस्काराने गौरव करण्यात आला आहे.
अमेरीकेतील ईस्ट बर्कशायर येथे त्या २००३ सालापासून कार्यरत आहे. त्या तेथील सरकारी रुग्णालयात फिजिओथेरपिस्ट विभागाच्या प्रमुख पदावर कार्यरत आहे. त्यांचे प्राथमिक शिक्षण हे नाशिक शहरातील निर्मला कॉन्व्हेंटमध्ये झाले तर त्यांनी आपले वैद्यकीय शिक्षण हे प्रवरा मेडिकल कॉलेजमधून पूर्ण केले आहे. त्यांच्या या विशेष सन्मानाबद्दल नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे वरिष्ठ उपाध्यक्ष राजेंद्र फड, व्यावसायिक दिलीप हांडे, शिवसेना वाहतूक आघाडीचे अध्यक्ष बापू ताकाटे, नाशिक वाहतूक आघाडीचे सचिव मनोज उदावंत यांनी त्यांचे अभिनंदन केले.