शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 4 जुलै 2018 (16:20 IST)

इंग्लंडमध्ये महाराणी एलिझाबेथ यांच्या निधनाची तयारी

इंग्लंडच्या महाराणी एलिझाबेथ (९२) वार्धक्याने थकल्या असून अत्यवस्थ आहेत. त्यांच्या प्रकृतीकडे पाहाता त्यांचे कधी काय होईल सांगता येत नाही. त्यामुळे ऐनवेळी फजिती नको म्हणून इंग्लंडमधील मंत्रिमंडळ आतापासूनच त्यांच्या शोक कार्यक्रमाच्या तयारीला लागले आहे. या रंगीत तालमीला ‘कॅसल डव’असे नाव देण्यात आले आहे. इंग्लंडच्या राजघराण्यात एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूआधीच त्याच्या शोक कार्यक्रमांचा अशा प्रकारे पहिल्यांदाच गुपचुप सराव करण्यात आला आहे.
 
दरम्यान, इंग्लंडमध्ये मंत्र्यांनी सरकारी अधिकाऱ्याशी पहिल्यांदाच यावर चर्चा केली आहे. महाराणींचे देहावसान झाल्यास त्याबद्दल इंग्लंडचे पंतप्रधान जनतेला संबोधित करणार असल्याचे सांगण्यात आले आहे. गेल्या दहा दिवसांपासून ही रंगीत तालीम सुरू आहे. यात महाराणींचे निधन झाल्यावर होणाऱ्या कार्यक्रमांची माहितीही येथील मीडियाने प्रसिद्ध केली आहे. यात महाराणींचे देहावसान झाल्यावर बकिंगहॅम पॅलेसच्या मुख्य प्रवेशद्वारावर नोटीस लावण्यात येईल. तसेच त्यानंतर जगभरातील मीडियाला ही नोटीस पाठवली जाईल, असे स्थानिक मीडियाने दिलेल्या माहितीत सांगण्यात आहे.