testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

बँकॉकमध्येही नवरात्रीची धूम

जितेंद्र जायसवाल|
- जितेंद्र जायसवाल

थायलंडची राजधानी येथे सर्वात जुने हिंदू मंदिर श्री मरियम्मनमध्ये नवरात्री महोत्सव
गाजत आहे. 1879 साली बनलेल्या या मंदिरात देवी पार्वती आपल्या दक्षिण भारतीय स्वरूपात विराजमान आहे.
मंदिर परिसरात देवी दुर्गाची भव्य प्रतिमा स्थापित केलेली आहे. पांडाल फुलांनी सजवले आहेत. येथे सकाळ-संध्याकाळ पूर्ण विधी‍-विधानाने शक्ती स्वरूपाचे पूजन आणि हवन केले जात आहे.
दुर्गा देवीची थाय समुदायात त्याचप्रकारे पूजा केली जाते ज्याप्रकारे भारतात, म्हणूनच मंदिरात येणार्‍या भक्तांमध्ये भारतीयपेक्षा थाय भक्त अधिक दिसून येतात. त्यांची पूजा करण्याची पद्धतदेखील भारतीय भाविकांसारखीच आहे. नवरात्रीच्या महोत्सवात
येथे दररोज वेगवेगळे आयोजन केले जात असून दसर्‍याला पूर्णाहुती देण्यात येईल. यादिवशी येथील रस्ते बंद राहतील आणि देवी मंदिरातून बाहेर येऊन भ्रमणासाठी निघेल.


यावर अधिक वाचा :