गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By

खोटारडा पाकिस्तानचा भारताने फाडला बुरखा

भारतानं संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेमध्ये  पाकिस्तानच्या खोटेपणाला जबरदस्त  उत्तर  दिले आहे. यामध्ये आपल्या देशाच्या  राजदूत पॉलोमी त्रिपाठी यांनी शहीद लेफ्टनंट उमर फय्याज यांचे फोटो दाखवले आहेत. शहीद लेफ्टनंट उमर फय्याज  यांची  मे 2017मध्ये काश्मीरमध्ये पाकिस्तानातील दहशतवाद्यांनी निर्घृण हत्या केली होती. मात्र हे सांगतांना पाकिस्तान ने मोठीचूक  केली होती.
 
या वेळी झालेल्या हल्ला आम्ही केला नाही तर भारताने केला असे सांगत  राष्ट्रसंघातील पाकिस्तानच्या प्रतिनिधींनी पॅलेस्टिनी महिलेचा फोटो काश्मीरमधील पीडित म्हणून दाखवला होता, त्यावर भारताच्या प्रतिनिधींनी हे चोख प्रत्युत्तर देत पाकिस्तानचा खोटेपणा   उघड केला होता. आपल्या देशाच्या  राजदूत पॉलोमी त्रिपाठी यांनी शहीद लेफ्टनंट उमर फय्याज यांचा फोटो संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेत पाकला पूर्ण उघडे पाडले आहे.
 
 भारतानं सांगितले की,पाकिस्तान हा एक खोटा देश असून तो नेहमी प्रमाणे चुकीची आणि खोटी गोष्ट  रचण्यासाठी बनावट फोटोचा वापर करतो आहे. तर असे काल्पनिक पुरावे देवून  जागतिक दहशतवादातील पाकिस्तानच्या भूमिकेहून जगाचं लक्ष भरकटवण्याचा प्रयत्न पाकिस्तान करत आहे. 
 
 पाकिस्तानच्या मलीहा लोधी यांनी महिलेचा फोटो दाखवला होता. लोधी यांनी दाखवलेल्या फोटोतील महिलेच्या चेहऱ्यावर बंदुकीच्या छऱ्यांनी झालेल्या जखमांच्या खुणा होत्या. हे सर्व पाहून आपल्या देशाने संपूर्ण उत्तरे राष्ट्र संघात दिले असून पाकला उघडे पाडले आहे.