testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

डुकाराच्या पोटातील दगडामुळे मालामाल

एखाद्या सामान्य दिसणार्‍या वस्तूचीही मोठीच किंमत असू शकते. व्हेलच्या उलटीलाही अशीच आंतरराष्ट्रीय बाजारात मोठी किंमत आहे. या उलटीच्या पदार्थांपासून चक्क महागडा परफ्यूम बनवला जातो.
असाच प्रकार चीनमध्ये घडला आहे. तेथील एका खेडुताला डुकराच्या पोटात दगडासारखी एक वस्तू मिळाली. आता या वस्तूमुळेच तो कोट्यधीश झाला आहे. बो चुलोऊ असे या माणसाचे नाव. त्याने मांसासाठी या डुकराला मारले होते. त्याच्या आतड्यात त्याला ही वस्तू सापडली. या दगडासारख्या वस्तूला संपूर्ण जगात मोठीच मागणी आहे. त्यामुळे त्याची किंमतही लाखो-कोट्यवधी रूपयांमध्ये आहे. या वस्तूपासून विविध प्रकारची औषधे बनवली जात असल्यानेच त्याला अशी मागणी आहे.

बो याला सुरवातीला याची काही माहिती नव्हती. मात्र, त्याच्या शेजार्‍यांनी त्याला ही एक विशेष वस्तू असून त्याबाबत चौकशी करण्याचा सल्ला दिला. त्यानुसार त्याने शांघायमध्ये जाऊन हा दगड तज्ज्ञांना दाखवला. त्यावेळी या चार इंच लांबीच्या वस्तूची किंमत 4 कोटी रूपये असल्याचे त्याला समजले.


यावर अधिक वाचा :