शुक्रवार, 20 सप्टेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: रविवार, 8 सप्टेंबर 2024 (11:24 IST)

अमेरिकेतील केंटकीमध्ये गोळीबारात अनेकांचा मृत्यू

अमेरिकेत गोळीबाराच्या घटना थांबत नाहीत. आता अमेरिकेच्या केंटकी राज्यात गोळीबारात अनेकांचा मृत्यू झाल्याची बातमी आहे. ही घटना लॉरेल काउंटी या केंटकी राज्यातील ग्रामीण भागात घडली. लॉरेल काउंटीच्या पोलीस अधिकाऱ्याने या घटनेची माहिती सोशल मीडियावर शेअर केली असून पोलीस प्रशासनाने घटनेच्या पार्श्वभूमीवर लोकांना घरातच राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.
 
लॉरेल काउंटीच्या I-75 भागात गोळीबाराची घटना घडली असून या घटनेनंतर परिसराची नाकेबंदी करण्यात आली आहे. पोलिसांनी या घटनेत जखमी आणि मृतांची संख्या जाहीर केलेली नाही, मात्र या घटनेत अनेकांचा मृत्यू झाल्याचे सांगितले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोळीबार करणारा संशयित अद्याप पकडला गेला नसून तो फरार आहे. पोलीस संशयिताचा शोध घेण्यात व्यस्त आहेत.

मृतांमध्ये दोन विद्यार्थी आणि दोन शिक्षकांचा समावेश आहे. या घटनेत सहा जण जखमीही झाले आहेत.लोकांना त्या भागात न जाण्याचे आवाहन केले आहे. 
Edited By - Priya Dixit