मंगळवार, 23 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 16 जानेवारी 2018 (15:04 IST)

श्रीलंकेत महिलांना मद्यखरेदी करण्यावर बंदी कायम

श्रीलंकेत पुरुषांप्रमाणेच महिलांनाही मद्य विकत घेता यावं, यासाठी कायद्यात दुरुस्तीच्या हालचाली सुरु होत्या, मात्र राष्ट्राध्यक्ष मैत्रीपाल सिरीसेना यांनी ही शक्यता उधळून लावली आहे. त्यामुळे आता महिलांना मद्यखरेदी करण्यावर असलेली बंदी कायम राहिली आहे.

महिलांना दारु खरेदी करण्यावर असलेली 40 वर्ष जुनी बंदी आठवड्याभरापूर्वी अर्थमंत्र्यांनी उठवली होती. नव्या कायद्यानुसार महिलांना दारु खरेदी करता येणार होती, त्याचप्रमाणे बार, पब उशिरापर्यंत उघडे ठेवता येणार होते. तसंच बार, डिस्टीलरी यांमध्ये महिलांनाही काम करता येणार होतं. मात्र 1979 मध्ये केलेल्या कायद्यातील दुरुस्ती मागे घेण्याचे आदेश अर्थमंत्र्यांना दिले. या निर्णयानंतर महिलांच्या हक्कांबाबत राष्ट्राध्यक्ष गंभीर नाहीत अशी टीका करण्यात येत आहे.