testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

न्यूज अँकरने 'असा' केला बलात्काराचा निषेध

Last Modified शुक्रवार, 12 जानेवारी 2018 (09:03 IST)

पाकिस्तानमध्ये एका ८ वर्षीय मुलीवर बलात्कार करुन हत्या करण्यात आली. या घटनेनंतर अनेक मातांनी धास्ती घेतलेय. या घटनेनंतर एका वृत्तनिवेदिकेने आपल्या चिमुकलीला स्डुडिओत नेत बातमीपत्र वाचले.

या वृत्तनिवेदिकाचा बातमीपत्राचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात बुधवारी ८ वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून
तिची हत्या करण्यात आली.
या घटनेनंतर तिथे हिंसक आंदोलन सुरु आहे.

एका न्यूज चॅनेलच्या टीव्ही अँकरने या बलात्काराच्या घटनेचा वेगळ्या प्रकारे निषेध केला आणि समाजाला एक संदेश देण्याचा प्रयत्न केलाय. तिने आपल्या मुलीला सोबत घेत लहान मुलीवरील बलात्कार आणि हत्येची बातमी वाचली. किरण नाज या समा न्यूज चॅनेलच्या अँकर आहेत. किरण या बातमी वाचताना त्या अतिशय भावूक झाल्या होत्या. मी किरण नाज नाही तर एक आई आहे, असं म्हणत त्यांनी कार्यक्रमाला सुरूवात केली. आणि लहान मुलांच्या सुरक्षिततेचा मुद्दा उपस्थित केला.यावर अधिक वाचा :