Widgets Magazine
Widgets Magazine
Widgets Magazine

तब्बल 65 लाख रुपयांचे कमोड

toilet seat
सोन्यासारख्या राजधातूचा वापर हल्ली कशातही केला जात आहे. गेल्यावर्षी अमेरिकेतल्या गुगेनहेम संग्रहालयात ठेवण्यात आलेल्या सोन्याच्या कमोडची तुफान चर्चा जगभरात रंगली होती. इटलीचे प्रसिद्ध आर्टिस्ट मेरिजियो कॅटिलेन यांनी तो तयार केला होता. हा सोन्याचा कमोड संग्रहालयातील सार्वजनिक स्वच्छतागृहात वापरण्यासाठी ठेवण्यात आला. या सोन्याच्या कमोडनंतर आणखी एका कलाकाराने सर्वात महागडा असा कमोड तयार केला आहे, त्याची किंमत ऐकाल तर आपल्यासारख्या सामान्यांना जबरदस्त धक्का बसणार हे नक्की. या ब्रँडच्या काही पर्सच्या किमती या लाखोंच्या घरात आहेत.

लिमाने मोठे कसब वापरुन यापासून कमोड तयार केला. तो तयार करण्यासाठी तीन महिन्यांचा कालावधी लागला. सध्या हे कमोड विक्रीसाठी ठेवण्यात आले असनू त्याची किंमत सुमारे 65 लाख हजारांच्या आसपास ठेवण्यात आली आहे. या कमोडच्या सीटवर सोन्याचा मुलामा लावण्यात आला आहे. त्यामुळे हे कमोड झळाळते आहे. अर्थात सोन्याचे किंवा महागड्या पर्सचे असले तरी कमोडचा वापर शेवटी तस्साच!
या कमोडची भारतीय रुपयांप्रमाणे किंमत सुमारे 65 लाखांहूनही अधिक आहे. या कमोडसाठी केवळ सोन्याचा नव्हे, तर महागड्या पर्सचाही वापर केला आहे. जगप्रसिद्ध ब्रँड लुईस विटॉनच्या पर्सचा कपडा वापरुन हे कमोड तयार करण्यात आले आहे. यासाठी लिमा गोरे या कलाकाराने जवळपास 10 लाख किमतीच्या लुईस विटॉनच्या पर्स वापरल्या आहेत.


यावर अधिक वाचा :