शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: रविवार, 27 ऑक्टोबर 2019 (09:57 IST)

ब्राझील फिरायला जायचं, मग व्हिजाची गरज नाही

ब्राझीलचे राष्ट्रपती जैर बोल्सोनारो यांनी  आता भारतीय पर्यटकांना ब्राझीलमध्ये येण्यासाठी व्हिजाची आवश्यकता नसल्याची घोषणा त्यांनी केली आहे. देशातील व्यवसाय वाढवण्यासाठी अनेक देशांना व्हिजा फ्री एन्ट्री देणार असल्याचं ते म्हणाले.
 
ब्राझीलचा व्हिजा तयार होण्यासाठी आतापर्यंत १० ते १५ दिवसांचा कालावधी लागत होता. तर वर्क व्हिजा ७ ते १० दिवसांत मिळत होता. 
 
ब्राझील सरकारने यावर्षी अमेरिका, कॅनडा, जपान आणि ऑस्ट्रेलियातील पर्यटक आणि व्यवसायिकांसाठी व्हिजाची अनिवार्यता संपुष्ठात आणली. या देशांनी, ब्राझीलच्या नागरिकांसाठी फ्री व्हिजाची कोणतीही घोषणा केली नाही.