1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. आंतरराष्ट्रीय
Written By wd|
Last Modified: काओसिउंग , शनिवार, 2 ऑगस्ट 2014 (10:49 IST)

तैवानमध्ये गॅसपाईपलाईनमध्ये स्फोट;24 जणांचा मृत्यू

तैवानमध्ये गॅसपाईपलाईनमध्ये अनेक स्फोट होऊन त्यात 24 जणांचा मृत्यू होवून जवळपास 270  जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. गॅसगळती झाल्यामुळे हे स्फोट झाल्याचे समजते. या स्फोटाची तीव्रता इतकी भीषण होती की, त्यामुळे अनेक रस्ते खचले आणि गाडयांचे नुकसान झाले आहे. 
 
काओसिउंग शहरात अनेक ठिकाणी गॅस पाइप, वीज वाहून नेणार्‍या तारांचे जाळे आणि सांडपाणी वाहून नेणारे गटार हे सगळे एकमेकांना खेटून आहे. त्यामुळे दुर्घटना झाल्याने रस्त्यावर अचानक आग पसरली. अनेक गाड्यांनी पेट घेतला आणि लागोपाठ स्फोट झाल्यामुळे भूकंपाचा धक्का बसल्यासारखा मोठा हादरा बसला.