1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By

बीअरच्या बाटल्यांपासून बनविले मंदिर!

बुद्धी आणि मेंदूला विकारांपासून वाचविण्यासाठी बौद्ध धर्मात मद्य वर्जित आहे. आता थायलंडच्या भिक्खूंनी बुद्धांच्या शिकवणीवर खरे उतरत एक चांगले काम केले आहे. त्यांनी निकामी झालेल्या बीअरच्या बाटल्यांपासून एक बौद्ध मंदिर उभारले आहे.
 
हे मंदिर बँकॉकपासून 645 कि.मी. अंतरावर खुन हान कॉम्प्लेक्समध्ये आहे. मंदिर उभारण्यासाठी भिक्खूंनी बीअरच्या 15 लाख रिकाम्या बाटल्यांचा वापर केला. मंदिराला टेम्पल ऑफ मिलियन बॉटल्स (दहा लाख बाटल्यांचे मंदिर) संबोधले गेले आहे. मंदिरांच्या भिंती, छत इत्यादी बनविण्यात जेथे बाटल्यांचा वापर झाला, तेथे फरशांमध्ये बाटल्यांच्या झाकणांचा वापर करण्यात आला आहे. भिक्खूंनी निकामी झालेल्या बाटल्यांपासून इतर बांधकामाची जबाबदारीही स्थानिक प्रशासनाला पाठविली आहे. भिक्खू एबट सान काटाबून्योने सांगितले, जसेजसे आम्हाला बाटल्या मिळत जातील, आम्ही दुसरे भवनही बनवित जाऊ. 1984 पासून बाटल्या गोळा करीत असलेले भिक्खू 10 लाखांचा आकडा ओलांडल्यानंतरच थांबले. 
 
या इको-फ्रेंडली मंदिराला स्वच्छ ठेवण्यासही काही विशेष अडचणी येत नाहीत. एका पर्यटकानुसार, बौद्ध धर्मात मद्य पिणे पाप असल्याचे सांगण्यात आले आहे. तेथे बीअरच्या बाटल्यांपासून मंदिर बनविणे सकारात्मक विचारसरणी प्रदर्शित करते.