1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 26 नोव्हेंबर 2014 (11:48 IST)

मोदी आणि शरीफ यांच्या बैठकीकडे लक्ष

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या संभाव्य बैठकीकडे लागल्या आहेत. दोन्ही देशांचे पंतप्रधान सार्क परिषदेच्या रिट्रीट कार्यक्रमावेळी समोरासमोर येतील. परंपरेनुसार सर्व नेत्यांमध्ये चांगले मैत्रिपूर्ण वातावरण निर्मीतीसाठी रिट्रीटचे आयोजन केले जाते. नेपाळमध्ये 12 वर्षानंतर सार्क परिषद होत आहे.
 
भारत आणि पाकिस्तानमध्ये गेल्या काही महिन्यांपासून संबंध तेवढे चांगले राहिलेले नाहीत. त्यामुळे  दोन्ही देशांमध्ये द्विपक्षीय बैठक होणार की नाही, याबद्दल शंका आहे. भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा  स्वराज यांनी देखील याबद्दलचा संभ्रम आणखी वाढविला आहे. त्या म्हणाल्या, 'काय होते ते उद्या  पाहू.' मात्र, दोन्ही देशांकडून भेटीची शक्यता कोणीही नाकारलेली नाही.
 
दरम्यान, मोदी आणि शरीफ यांची भेट झाली तर, सहा महिन्यातील ही दुसरी भेट असेल.  मोदींच्या शपथविधी सोहळ्यासाठी शरीफ भारतात आले होते. पराराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते सैय्यद  अकबरुद्दीन रविवारी म्हणाले होते, की पाकिस्तानसोबत  भारताला शांततेचे आणि सौहार्दपूर्ण संबंध हवे  आहेत. त्यासाठी दोन्ही देशांदरम्यान बातचीत होणे गरजेचे आहे.
 
सार्क शिखर परिषदेला 26 नोव्हेंबर पासून सुरुवात होणार आहे. 27 नोव्हेंबरला सर्व नेते धुलीखेल  या रमणीय ठिकाणी जाऊन अनौपचारीक चर्चा करणार आहेत. सायंकाळी काठमांडूमध्ये जाऊन संयुक्त  घोषणापत्र प्रसिद्ध केले जाईले.