सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. ऑटोमोबाइल
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: सोमवार, 1 फेब्रुवारी 2021 (11:37 IST)

BSNL ने आपला वार्षिक प्लान पुन्हा अपडेट केला

सरकारी टेलिकॉम कंपनी भारत संचार निगम लिमिटेड ने आपला १९९९ रुपयांचा वार्षिक प्लान अपडेट केला असून डेटा बेनिफट कमी केले आहे. BSNLच्या १९९९ रुपयांच्या प्लानमध्ये रोज ३ जीबी डेटा मिळत होता. परंतु, आता १ फेब्रुवारीपासून या प्लानमध्ये केवळ २ जीबी डेटा मिळू शकणार आहे. 
 
BSNL चा १९९९ रुपयांचा वार्षिक प्लान
BSNL च्या या प्लानमध्ये आता ३ जीबी ऐवजी २ जीबी डेटा रोज मिळणार आहे. या प्लानची वैधता आधी इतकीच ३६५ दिवसांची राहणार आहे. प्लानमध्ये अनलिमिटेड व्हाइस कॉलिंग, लोकल-एसटीडी कॉलची सुविधा मिळणार आहे. या प्लानमध्ये रोज १०० एसएमएस पाठवण्याची सुविधा आहे.
 
या प्लानमध्ये ग्राहकांना आता इरोस नाउचे अनलिमिटेड कॉन्टेंन्टचा फायदा मिळेल. हा फायदा पूर्ण ३६५ दिवसांसाठी असेल. तसेच ६० दिवसांसाठी लोकधून कॉन्टेंट फ्री मिळणार आहे. 
 
BSNL ने पीव्ही १९९९ साठी मल्टिपल रिचार्जची सुविधा १ फेब्रुवारी पासून परत घेण्याची घोषणा केली आहे. आता १९९९ रुपयांच्या प्लानला रिचार्ज केल्यास ग्राहकांना १ फेब्रुवारी पासून ३६५ दिवसांची वैधता मिळणार आहे.