मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: सोमवार, 4 मार्च 2019 (17:46 IST)

JIO वापरकर्त्यांसाठी खुशखबरी, जाणून घ्या नवीन प्लान

टेलीकॉम जगात आल्यापासूनच Reliance Jio सतत नवीन-नवीन योजना आणि ऑफर आपल्या वापरकर्त्यांसाठी सादर करत आहे. कंपनीच्या या योजनांमुळे इतर कंपन्यांनी देखील त्यांच्या योजनांमध्ये बदल केले आहे. चला रिलायन्स जिओच्या त्या प्रीपेड प्लॅनविषयी जाणून घ्या ज्यामध्ये वापरकर्त्यांना दोन आणि तीन जीबी रिचार्ज मिळतो.
 
* दररोज 2 जीबी डेटा देणारे पॅक :-
 
1. Jio 198 Plan - रिलायन्स जियो (Jio) च्या 198 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना 28 दिवसांसाठी दररोज दोन जीबी डेटा मिळतो. तर एकूण 56 जीबी डेटा मिळतो. योजनेची वैधता 28 दिवसांची आहे. त्याच वेळी, अनलिमिटेड कॉलिंग व्यतिरिक्त दररोज 100 एसएमएस देखील मिळतील. 
 
2. Jio 398 Plan - Jio 398 रिचार्ज प्लॅनमध्ये वापरकर्त्यांसाठी 70 दिवसांसाठी दररोज दोन जीबी डेटा मिळतो. याव्यतिरिक्त, व्हॉइस कॉल आणि अनलिमिटेड एसएमएस देखील उपलब्ध आहे. 
 
3. Jio 448 Plan - रिलायन्स जियोच्या 448 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनमध्ये 84 दिवसांसाठी दररोज दोन जीबी डेटा मिळेल. या प्रकारे 84 दिवसांत एकूण 168 जीबी डेटा मिळतो. त्याच वेळी, कॉलिंग आणि अनलिमिटेड एसएमएस देखील प्रदान केले जातात.
 
* दररोज 3 जीबी डेटा देणारा पॅक :-
 
Jio 3GB Plan - याची किंमत 299 रुपये आहे. रिलायन्स जियोच्या 299 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना दररोज तीन जीबी डेटा दिला जातो. या योजनेची वैधता 28 दिवसांची आहे.