गूगलला 4.3 अब्ज युरोचा दंड
आपली मक्तेदारी रहावी याकरिता गूगलने अॅन्ड्राईड या ऑपरेतींग सिस्टिमचा चूकीचा वापर केल्याचा ठपका गूगलवर लावण्यात आला आहे. याप्रकरणी गूगला 4.3 अब्ज युरो म्हणजेच ३४,३०८ कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. गूगल सर्च इंजिनला मजबूत ठेवण्यासाठी त्यांनी अॅन्ड्राईडचा केलेला वापर हा अॅन्टी ट्रस्ट नियमांनुसार बेकायदा आहे. हा प्रकार पुढील 90 दिवसांमध्ये थांबला नाही तर प्रतिदिन 5% या दराने त्यांना दंड भरावा लागेल असे युरोपिअन संघाचे आयुक्त मार्ग्रेथ वेस्टेजर यांनी ट्विटरच्या माध्यमातून सांगितले आहे.
युरोपियन संघाच्या या दंडात्मक कारवाईवर कोर्टात आव्हान देणार असल्याचे गूगलने स्प्ष्ट केले आहे. युरोपियन संघाने ठोठावलेला दंड हा यंदा मागील दंडापेक्षा दुप्पट आहे. मागील वेळेस गुगलवर 2.4 अब्जचा दंड ठोठावण्यात आला होता. गूगलने अनेक अन्य अॅप आणि सेवांच्या वापरासाठी गूगल सर्चला डिफॉल्ट सर्च इंजिन बनवले आहे. सोबतच गूगल सर्चला प्री इंस्टॉल करण्यासाठी स्मार्टफोन निर्मात्यांना, मोबाईल नेटवर्क कंपन्यांना मदत केली आहे. या प्रकरणामुळे अमेरिका आणि युरोपियन संघामधील व्यापार शुल्काला घेऊन तणाव निर्माण झाला आहे.