1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: गुरूवार, 10 मे 2018 (09:35 IST)

'गूगल न्यूज' च्या व्या फिचर्समध्ये बदल

google news
'गूगल न्यूज'नं आपल्या नव्या फिचर्समध्ये बदल केलेत. गूगलच्या वार्षिक सुधारणा कॉन्फरन्स I/O 2018 च्या दरम्यान ही घोषणा केली गेली. गूगल न्यूजमध्ये आणखीन काही नवे फिचर्स आणि नवे ऑप्शन जोडले गेलेले आहेत. कंपनीनं केलेल्या दाव्यानुसार, हे यूजर एक्सपिरिएन्स आणखीन सुधारणा करण्याचं काम करेल. बदललेलं गूगल न्यूज वेब, अॅन्ड्रॉईड आणि आयओएसमध्ये पुढच्या आठवड्यापासून सुरू होईल. मोबाईलमध्ये दिसणाऱ्या गूगल न्यूजवर मोबाईलसाठी कस्टमाईज केलेल्या बातम्या असतील. त्यामुळे  या बातम्या सहजगत्या उघडू शकाल. 
 

गूगल न्यूज अपडेट 127 देशांत दिलं जाईल. गूगलचा सीईओ सुंदर पिचाईनं इव्हेंटच्या किनोट स्पीच दरम्यान म्हटलंय की, पत्रकारितेला सुधारण्याचं काम गूगल करत आहे आणि या दरम्यान गूगल न्यूजमध्ये अनेक बदल करण्यात आलेत.