गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. ऑटोमोबाइल
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Updated : सोमवार, 17 फेब्रुवारी 2020 (11:48 IST)

अॅप ToTok ला पुन्हा एकदा प्ले स्टोअरमधून हटलवे

गुगलने पॉपुलर मेसेजिंग एप टूटॉकला (ToTok) पुन्हा एकदा प्ले स्टोअरमधून  हटलवे आहे. या एपद्वारे संयुक्त अरब अमीरात (युएई) सरकारकडून लोकांवर लक्ष ठेवले जात होते, असा दावा केला जात आहे. यापूर्वीही या एपला डिसेंबरमध्ये एपल प्ले स्टोअर आणि गुगल प्ले स्टोअरमधून हटवले होते. त्यामुळे ज्यांनी हे एप इन्स्टॉल केले आहे. त्यांचा डेटा सुरक्षित नाही. यामध्ये प्रत्येकाच्या वैयक्तिक गोष्टी, हालचालींवर लक्ष ठेवले जात आहे. याशिवाय युजर्सच्या फोटो आणि इतर कॉन्टेटवरही लक्ष ठेवले जात आहे, अशी माहिती एका रिपोर्टमधून समोर आली आहे.
 
हे एप टेलीग्राम आणि सिग्नल एपपसारखे काम करते. या एपला मिडल ईस्ट, यूरोप, अशिया, अफ्रिका आणि उत्तरी अमेरिकामध्ये अँड्रॉईड आणि आयओएस डिव्हाईसवर लाखोवेळा डाऊनलोड केले आहे, असं अमेरिकेच्या गुत्पचर विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.