1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: शुक्रवार, 28 जून 2019 (15:05 IST)

5G सुरू झाल्यानंतर LG आपले जागतिक स्मार्टफोन भारतात सादर करेल

कोरियाची अग्रगण्य तंत्रज्ञान कंपनी LG ला उमेद आहे की 2020 मध्ये 5 जी सेवा सुरू होईल आणि त्या नंतर ते आपल्या काही मुख्य 5जी स्मार्टफोन मॉडेल भारतीय बाजारात सादर करणार आहे. 
 
एलजी इंडिया प्रमुख यांच्याप्रमाणे कंपनीला उमेद आहे की 2020 च्या मध्यात, 5G सेवा भारतात सुरू होईल. अमेरिका, कोरिया आणि युरोपमधील काही भागांत 5जी सुरू झालं आहे आणि या भागांमध्ये एलजीने LG V50 मॉडेल काढले आहे. 
 
कंपनीच्या मते भारतात 5G आल्यानंतरच आम्ही आधीच अनेक उत्पादने सादर करून चुकलो असू. सर्वांना माहीत आहे की भारतीय स्मार्टफोन बाजारात एलजीचा हिस्सा उल्लेखनीय नसून आता मात्र मोबाइल कंपनीचा हेतू 5जी सेवांना भारतात सादर करण्यापूर्वी एक महत्त्वपूर्ण भागीदारी मिळविण्याचा आहे.