1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: मंगळवार, 5 डिसेंबर 2017 (09:25 IST)

जिओचे इंटरनेटचे दोन नवे प्लॅन

new plan of reliance jio

आता पुन्हा एकदा जिओनं हाय स्पीड इंटरनेटचे नवे प्लॅन लाँच केल्या आहेत.

509 रुपयांच्या प्लॅन

जिओ वेबसाइटवरील माहितीनुसार, 509 रुपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज 2 जीबी हायस्पीड डेटा मिळणार आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकांना फ्री अनलिमिटेड लोकल-एसटीडी कॉल, मेसेज आणि फ्री रोमिंग मिळणार आहे. या प्लॅनमध्ये 98 जीबी डेटा मिळणार आहे. दोन जीबीपर्यंत हाय-स्पीड डेटा वापरल्यानंतर स्पीड कमी होऊन 64 केबीपीएस होईल. या प्लॅनची व्हॅलिडिटी 49 दिवसांसाठी असणार आहे.

799 रुपयांचा प्लॅन

जिओच्या 799 रुपयांच्या प्लॅनमध्ये 3 जीबी हाय स्पीड डेटा मिळणार आहे. ज्यामध्ये ग्राहकांना अनलिमिटेड कॉलिंगही असणार आहे. या प्लॅनमध्ये 84 जीबीपर्यंत डेटा मिळणार असून याची व्हॅलिडिटी 28 दिवसांसाठी असणार आहे.