बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: मंगळवार, 15 जानेवारी 2019 (09:08 IST)

आता युट्यूब शेअरचा पर्याय निवडावा लागेल

आतापर्यंत युट्यूबवर अपलोड केलेला कोणताही व्हिडिओ थेट ट्विटरवर शेअर होण्याची सुविधा युट्यूबकडून देण्यात आली होती. जर युट्यूबच्या खातेधारकाने त्याच्याकडील सेटिंग्जमध्ये तशी सुविधा निवडली असेल, तर त्याने युट्यूबवर अपलोड केलेले सर्व व्हिडिओ थेट ट्विटरवर शेअर केले जात होते. पण आता ही सुविधा बंद होणार आहे. त्यामुळे युट्यूब वापरणाऱ्यांना व्हिडिओ अपलोड केल्यानंतर मग त्यावरील शेअरचा पर्याय निवडून त्या माध्यमातूनच ट्विटर किंवा इतर सोशल मीडिया वेबसाईटवर व्हिडिओ शेअर करता येतील. 
 
युट्यूबच्या सेटिंग्जमध्ये जाऊन कनेक्टेड अॅप्सवर क्लिक करायचे तिथे Share your public activity to Twitter हा पर्याय निवडला की युट्यूबवरचे व्हिडिओ थेट ट्विटरवर जात होते. पण आता ही सुविधा बंद होईल. हा पर्याय तिथून काढण्यात येणार आहे. आता कोणताही व्हिडिओ पू्र्णपणे अपलोड झाल्यानंतर ग्राहकाला सोशल मीडियावर तो शेअर करण्यासाठी बटण दिसतील. तिथून क्लीक केल्यावरच हे व्हिडिओ युट्यूबवर अपलोड करता येतील.