गुरूवार, 28 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

पृथ्वीराजची सातारा सैनिक स्कूलसाठी निवड

लासुर्णे येथील पृथ्वीराज मुळीक याची सातारा येथील सैनिक स्कूलसाठी निवड झाली आहे. कळंब येथील फडतरे नॉलेज सिटीच्या श्री व्यकंटेश्‍वरा इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये नर्सरी पासूनचे शिक्षण पृथ्वीराजने पूर्ण केले. जानेवारी 2018 मध्ये केंद्र शासनाच्या वतीने घेण्यात आलेल्या सातारा सैनिक स्कूलच्या लेखी पूर्व परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाल्याने मेडीकल तपासणी व मुलाखतीस पात्र ठरला. यानंतर या दोन्ही परीक्षेमध्ये उत्तीर्ण होत या स्कूलमध्ये इयत्ता सहावीच्या वर्गासाठी निवड झाली आहे. शाळेचे मुख्याध्यापक संदीप पानसरे यांचे पृथ्वीराजला मार्गदर्शन लाभले. संस्थेचे अध्यक्ष उत्तम फडतरे व सचिव दत्तात्रेय फडतरे यांनी पृथ्वीराजचे अभिनंदन केले असून त्यास पुढील शिक्षणास शुभेच्छा दिल्या.