रविवार, 24 नोव्हेंबर 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By

भारतीय ज्योतिषानुसार जोडीदाराची निवड

लग्न ही आपल्या समाजातील एक खूप मोठी घटना असते. केवळ ती व्यक्ती किंवा कुटुंबासाठीच नव्हे तर विवाहसंस्था आपली आद्य सामाजिक संस्था आहे. त्यामुळे लग्न करणे आणि आपल्याला अनुरूप जोडीदार शोधणे हे अतिशय महत्त्वाचे आहे. भारतीय ज्योतिषशास्त्र व संख्याशास्त्राचा वापर करून तुम्ही आपला जीवनसाथी शोधू शकता.

भारतीय ज्योतिषामध्ये जन्मतारीख, वेळ व स्थानाचा वापर करून जन्मपत्रिका किंवा कुंडली बनवली जाते. दोन व्यक्तींची जन्मपत्रिका जर जुळली तर त्यांच्या लग्नाला मान्यता मिळते. यासाठी ३६ गुणांमध्ये त्या पत्रिका जुळतायत की नाही हे पाहिले जाते. अर्धे किंवा अध्र्यापेक्षा अधिक गुण जुळत असतील तर ती पत्रिका जुळली असे मानले जाते.

१८ ते २७ गुण जुळलेले विवाह यशस्वी होतात असे मानतात. गुणांच्या माध्यमातून स्वभाव, मते, आवडीनिवडी, आकर्षण, भाग्य किंवा हानी, एकमेकांतील प्रेम, संतती याबद्दल आडाखे बांधले जातात. इतकेच नव्हे तर ग्रहांची अनुकूलता हाही एक महत्त्वाचा भाग आहे. ग्रहांची सौम्यता, उग्रपणा हेही पाहिले जाते. एखाद्या व्यक्तीचे ग्रह क्रूर व उग्र असतील तर त्याचा जोडीदार सौम्य किंवा मृदू नसावा कारण उग्र व्यक्तीच्या संपर्कात येऊन त्याचेही ग्रह उग्र बनून त्यांचे गृहस्थाश्रम नष्ट होण्याची शक्यता असते.