बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By

‘अॅपल’ च्या जाहिरातीमध्ये संगीतकार ए.आर.रहमान झळकला

‘अॅपल’ च्या एका जाहिरातीमध्ये संगीतकार ए.आर.रहमान झळकला आहे. खुद्द रहमाननेच ट्विट करत याविषयीची माहिती दिली. रहमानच्या एका कृष्णधवल सेल्फीची निवड आयफोनच्या जाहिरातीसाठी करण्यात आली असून, या ब्रॅंडच्या प्रमोशनसाठी निवडला गेलेला तो पहिला भारतीय सेलिब्रिटी ठरला आहे.
 

एक चांगला संगीतकार असण्यासोबतच रहमान चांगला छायाचित्रकारही आहे. खरंतर छायाचित्रकाराकडे असणारी नजर त्याच्याकडे आहे, असं म्हणायला हरकत नाही. सोशल मीडियावर त्याने पोस्ट केलेले फोटो पाहता याचा प्रत्यय येतोय. विविध ठिकाणांना भेट देणारा रहमान नेहमीच त्या ठिकाणांना आपल्या कॅमेऱ्यात कैद करुन प्रेक्षकांपर्यंत ही सुरेख ठिकाणं पोहोचवतो. त्याच्या असंख्य फोटोंमधून एका सुरेख सेल्फीची निवड आयफोनच्या जाहिरातीसाठी करण्यात आली आहे. रहमानने तो सेल्फी आयफोनच्याच माध्यमातून टीपला आहे.