testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

बर्गर वादावर पिचाईचे मार्मिक उत्तर

Last Updated: सोमवार, 30 ऑक्टोबर 2017 (17:15 IST)

‘बर्गरमध्ये चीज स्लाईस हे पॅटीच्या खाली असावे, की वर?’ यावरुन सोशल मीडियावर वाद सुरू आहे. त्यातून गुगलच्या बर्गर इमोजीमध्ये चीज स्लाइस हे सर्वांत खाली दाखवण्यात आले आहे, तर अॅपलच्या बर्गर इमोजीमध्ये चीज स्लाइस हे सर्वांत वर दाखवण्यात आहेत, त्यामुळे अॅपलचे इमोजी बरोबर की गुगलचे? यावर चर्चा सुरू आहे. सदरचा वाद जेव्हा पिचाईपर्यंत पोहोचला तेव्हा त्यांनी मार्मिक उत्तर देत हा प्रश्न उडवून लावला. ‘जगातले सर्वात महत्त्वाचे मुद्दे बाजूला ठेवू आणि फक्त या विषयावर चर्चा करू’ असं ट्विट करून त्यांनी वाद तिथेच थांबवला.

‘बर्गरमध्ये चीज कुठे असावे, याविषयावर सर्वांचे एकमत झाले, तर आम्ही सोमवारी सर्व महत्त्वाचे मुद्दे बाजूला ठेवू आणि प्रश्नाला प्राधान्य देऊ,’ असं ट्विट करत या त्यांनी बॅकडलसह सगळ्यांना चिमटा काढला. पिचाईंचे ट्विट आतापर्यंत १४ हजार लोकांनी रिट्विट केलं, तर दीड हजारांहून अधिक लोकांनी यावर प्रतिक्रियाही नोंदवल्या आहेत.यावर अधिक वाचा :