मंगळवार, 26 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: बुधवार, 7 मार्च 2018 (10:39 IST)

व्हाट्सअॅपचे मेसेज एका तासानंतरही डिलीट करा

whats app

व्हाट्सअॅपच्या डिलीट फॉर एव्हरीवन या फिचरमध्ये अपडेट करण्यात आले आहे. या अपडेशनमुळे व्हाट्सअॅपवर पाठवलेले मेसेज आता एका तासानंतरही डिलीट करता येणार आहेत. युजर्सना ४,०९६ सेकंदांनी म्हणजे सुमारे ६८ मिनिटांनीही मेसेज डिलीट करता येतील. यापूर्वी मेसेजेस फक्त ७ मिनीटांच्या आत डिलीट करावे लागत होते. WABetaInfoनुसार, हे अपडेशन सध्या व्हाट्सअॅपच्या v2.18.69बीटा व्हर्जनवर उपलब्ध आहे. या व्यतिरिक्त व्हॉट्सअॅपवर व्हाईस मेसेज लॉकिंग आणि स्टीकर पॅक साईज डिस्प्लेचे देखील अपडेशन लवकरच येत आहेत.