testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

WhatsApp वर लागोपाठ मेसेज पाठवत असाल तर बंद होईल आपलं अकाउंट

whatsapp
जगातील सर्वात फास्ट इंस्टेंट मेसेजिंग सर्व्हिस प्रदान करणारी कंपनी व्हाट्सअॅपने मोठ्या प्रमाणात संदेश पाठवणार्‍यांविरुद्ध मोठा निर्णय घेतला आहे. व्हाट्सअॅप आता अशा लोकांचं अकाउंट बंद करेल जे दररोज लागोपाठ मेसेज पाठवत असतात.

कंपनी अशा लोकांविरुद्ध कायदेशीर कारवाई देखील करू शकते. जाणून घ्या याबद्दल...

व्हाट्सअॅपने आपल्याला ब्लॉगमध्ये म्हटले आहे की कंपनी अशा लोकांचे व्हाट्सअॅप अकाउंट बंद करेल जे बल्क (मोठ्या प्रमाणात) इतर लोकांना मेसेज पाठवतात. याची सुरुवात 7 डिसेंबर 2019 पासून सुरू होणार. कंपनीने आपल्या ब्लॉगमध्ये म्हटले की-

व्हाट्सॅपवर 90 टक्के मेसेज खासगी असतात परंतू मागील काही वर्षांपासून बल्क मेसेजेसच ट्रेड सुरू झाले आहे.
बल्क मेसेजमध्ये सर्वात जास्त सर्व राजकीय पक्ष आणि डिजीटल मार्केटिंग करणार्‍यांचे मेसेज असतात. अशाच प्रकारे दररोज मोठ्या प्रमाणात बोगस बातम्या शेअर केल्या जातात. म्हणूनच व्हाट्सअॅपचे हे पाऊल बल्क मेसेज आणि फेक न्यूज थांबविण्यासाठी काम करेल

जाणून घ्या किती मेसेज केल्यावर होईल नियमांचे उल्लंघन
व्हाट्सअॅपप्रमाणे एखाद्या अकाउंटहून 15 सेकंदात 100 मेसेज पाठवले जात असतील तर त्या अकाउंटला बल्क मेसेजचा दोषी मानले जाईल आणि त्याचे अकाउंट बंद करण्यात येईल.
तसेच अकाउंट बनल्यावर लगेच अर्थात 5 मिनिटाच्या आत अनेक मेसेज पाठवायला सुरुवात झाल्यास कंपनी त्या विरुद्ध कारवाई करेल.
कंपनी असे अकाउंट्स देखील बंद करेल जे काही वेळापूर्वी उघडले असून त्या अकाउंटवरून अनेक समूह तयार केले जात असतील. जसे आपण एक अकाउंट उघडल्यावर लगेच त्या अकाउंटवरून अनेक ग्रुप्स तयार करायला सुरू केल्यास कंपनी त्यावर कारवाई करेल.

या प्रकारे कंपनीला एखाद्या उद्देशाने अकाउंटवर होत असलेल्या क्रियाकलाप बघून अकाउंट बंद करता येईल. कारण इंस्टेट मेसेज सर्व्हिस असल्यामुळे या सेवेद्वारे काही सेकंदातच फेक बातम्या हजारो लोकांपर्यंत पोहचून त्या फारवर्ड केल्या जातात. फेक न्यूजवर ताबा ठेवण्यासाठी यापूर्वी देखील बदल करण्यात आले असून कंपनी सातत्याने यावर लक्ष घालत असते.


यावर अधिक वाचा :

ICC चे हे 7 नियम वर्ल्डकप स्पर्धेत पहिल्यांदाच लागू होतील

national news
क्रिकेट वर्ल्ड कपचा 12वा संस्करण ग्लंड-वेल्समध्ये 30 मे पासून सुरू होईल. यावेळी फक्त 10 ...

ज्या गुरुजीने लग्न लावून दिले, त्यासोबत 15 दिवसाने पळाली ...

national news
ऐकायला फिल्मी आणि विचित्र वाटेल पण ज्या गुरुजीने लग्न लावून दिले, नवरी त्यासोबत पळून ...

Whatsapp वर येणार आहे हा खास फीचर, करेल वेळेची बचत

national news
सोशल मीडिया वापरकर्त्यांसाठी एक चांगली बातमी आहे. व्हाट्सएप एक नवीन फीचर आणत आहे ज्याच्या ...

लठ्ठ असल्यामुळे सासरच्यांकडून छळ, विवाहितेची आत्महत्या

national news
ती शरीराने जरा जाड होती पण जाड असणे गुन्हा तर नाही. पण सतत कोणाला याची जाणीव करुन देणे ...

ड्यूल स्क्रीन लॅपटॉप, जाणून घ्या फिचर्स

national news
कॉम्पुटेक्ट 2019 कॉन्फरन्समध्ये Asus ने ड्यूल स्क्रीन असणारा लॅपटॉप लाँच केला आहे. ...

केतकी चितळेला अश्लील भाषेत ट्रोल करणाऱ्यांवर कारवाई करा- ...

national news
अभिनेत्री केतकी चितळेला सोशल मीडियावर खोट्या अकाउंटचा वापर करून अश्लील भाषेत ट्रोल ...

सनी देओल यांची खासदारकी धोक्यात

national news
पंजाबच्या गुरुदासपूरमधून भाजपाच्या तिकीटावर लोकसभा निवडणूक जिंकलेले अभिनेता-राजकारणी सनी ...

मास्तरचे विवाहित शिक्षिकेवर एकतर्फी प्रेम केला चाकू हल्ला

national news
महाविद्यालयात तरुण तरुणी प्रेमात पडतात किंवा त्यांच्यात भांडणे होतात. मात्र या प्रकरणात ...

लायसन्स मिळविणे झाले सोपे

national news
वाहन चालविण्याचा परवाना (लायसन्स) मिळवण्यासाठी किमान शैक्षणिक पात्रतेची अट काढून ...

राज्यपालांचे अभिभाषण म्हणजे ऑल ईज वेल नसून नथिंग ईज वेल - ...

national news
राज्यपालांच्या अभिभाषणाचा प्रस्ताव आज विधान परिषदेत अनिल परब यांनी मांडला. ...