मंगळवार, 19 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By

WhatsAppच्या नवीन अपडेटमुळे चॅटमध्ये चालेल यूट्यूब व्हिडिओ

मेसेजिंग एप व्हाट्सएपने नवीन अपडेट प्रसिद्ध केले आहे ज्यात यूजर चॅटमध्येच यूट्यूब व्हिडिओचा आनंद घेऊ शकतात. व्हाट्सएपने हा अपडेट आयफोन यूजरसाठी काढला आहे. हे अपडेट त्या लोकांसाठी फार फायदेशीर आहे जे यूजर्स व्हाट्सएपवर व्हिडिओ पाठवतात किंवा त्याला बघतात.  
 
हा नवीन अपडेट 'पिक्चर न पिक्चर मोड' (पीआईपी) आहे. याच्या मदतीने WhatsApp यूजर, चॅटमध्येच यूट्यूब व्हिडिओ बघू शकतात. या आधी यूट्यूब लिंकवर क्लिक करून त्या वेबसाइटपर्यंत रिडायरेक्ट व्हावे लागत होते. पण अपडेटनंतर फक्त क्लिक करताच तो यूट्यूब व्हिडिओ त्याच चॅटमध्ये प्ले होऊ लागेल.  
 
हा फीचर मल्टी टास्किंगचा आहे. जसे व्हाट्सएपवर यूट्यूब व्हिडिओ बघत असाल तर आणि दुसर्‍या चॅटमध्ये जायचे असेल तर तो व्हिडिओ बंद होणार नाही आणि तुम्ही ते बघू शकता.  
 
ज्या यूजर्सजवळ हे अपडेट आलेले नाही ते आपला एप आयओएसच्या आयट्यून स्टोअरहून अपडेट करू शकतात. एप अपडेट केल्यानंतर यूजरला दोन नवीन फीचर मिळतील. यामधील एक हे यूट्यूब व्हिडिओवाला आहे, आणि दुसरा ऑडियो रिकॉर्डिंगचा आहे कारण ऑडियो रिकॉर्डिंगला आधीपासूनच सोपे करण्यात आले आहे.