शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By

'यु ट्यूब' चे 14 व्या वर्षात पर्दापण

चॅड हर्ले, स्टीव्ह चेन आणि जावेद करीम या त्रिकुटाने जन्माला घातलेली यु ट्यूब' चे 14 व्या वर्षात पर्दापण केले आहे. ही संकल्पना आज जगभरात लोकप्रिय ठरली आहे.

आज जगात अनेक लोक टीव्ही पेक्षा अधिक यु ट्यूब व्हिडियो पाहताना आपल्याला दिसतात. आज यू ट्यूब या व्हिडीओ शेअरिंग वेबसाइटचे 14 व्या वर्षात पर्दापण झाले आहे. यू ट्यूबवर पहिला व्हिडीओ 23 एप्रिल 2005 रोजी अपलोड झाला होता. 'मी अॅट द झू' नावाचा हा व्हिडीओ आहे. यामध्ये यू ट्यूबचा संस्थापक जावेद करीम आहे. 

युजर्स आज सरासरी एक अब्ज तासापेक्षा अधिकचा वेळ यू ट्यूबवर घालवत आहेत. तर दीड अब्ज लोक महिन्याला यू ट्यूब बघतात. तर दुसरीकडे रोज नवीन युजर या कडे वळत आहेत. यातून आर्थिक उत्त्पन्न सुद्धा मिळते. त्यामुळे अनेकांनी आपल्या नावे येथे खाती सुरु करून आवडत्या  विषयावर व्हिडियो  टाकेल आहेत. त्यामुळे आता यापुढे टीव्ही पेक्षा अधिक यु ट्यूब' कडे प्रेक्षक वळत आहेत.