1. वृत्त-जगत
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: गुरूवार, 14 मे 2015 (10:18 IST)

‘कॅन्डी क्रश’ रीक्वेस्टपासून होणार सुटका

फेसबुकवर मिळणार्‍या गेम रीक्वेस्टनं त्रस्त झालेल्या यूजर्ससाठी एक आनंदाची बातमी आहे. आता फेसबुक यूजर्स अशाप्रकारच्या रीक्वेस्ट आणि रिमायंडरला ब्लॉक करू शकतात. 
 
फेसबुकनं सुरू केलेली ही सेवा सुरू करण्यासाठी तुम्हाला फक्त काही बटणं दाबावी लागणार आहेत. फेसबुक यूजर्सच सर्वाधिक तक्रारी गेम आणि अँपसाठी मिळणार्‍या मेसेजेसबाबत असतात. मात्र यातून तुम्ही मुक्ती मिळवू शकता.

यासाठी फेसबुक अकाउंट सेटिंगमधील ‘ब्लॉकिंग’ पर्याय निवडा. त्यामध्ये ‘ब्लॉक अँप इनवाईटस्’ हा पर्याय मिळेल. त्यामध्ये तुम्ही त्या व्यक्ती अथवा मित्राचं नाव टाईप करा, ज्याद्वारे मिळणार्‍या रीक्वेस्टमुळे तुम्ही त्रस्त झाले आहात. त्यानंतर तो व्यक्ती अथवा मित्र तुम्हाला कोणतीही रीक्वेस्ट पाठवू शकणार नाही. या सेटिंगचा उपयोग करून तुम्ही कोणत्याही अँपला कायमस्वरूपी ब्लॉक करू शकता.