मंगळवार, 16 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. कारगिल विजय दिवस
Written By
Last Updated : रविवार, 26 जुलै 2020 (19:43 IST)

Kargil Vijay Diwas : शहीद जवानाच्या बलिदानाची २१ वर्षे

भारतीय लष्करातील जवानांनी कारगिल युद्धा दर्शवलेल्या शौर्याला अभिवादन करण्यासाठी देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी दिल्ली अमर जवान विजय स्तंभाला भेट दिली.

दरम्यान, देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि गृहमंत्री अमित शहा यांनी कारगिल युद्धातील जवानांना श्रद्धांजली दिली असून त्यांनी या दिवसाच्या आठवणीत ट्विट केले आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे की, संपूर्ण जगाला माहिती असलेल्या इतिहासातील काही काळापूर्वी घडलेल्या आणि सर्वात आव्हानात्मक परिस्थितीतील या युद्धात विजय मिळवणाऱ्या भारतीय जवानांच्या शौर्याला मी सलाम करतो. तर गृहमंत्री अमित शहा यांनी, कारगिल विजय दिन हा भारताचा अभिमान, पराक्रम आणि खंबीर नेतृत्वाचे प्रतिक आहे. कारगिलच्या डोंगरांवरुन शत्रूला पिटाळून लावत तिथे पुन्हा तिरंगा फडकवणाऱ्या जवानांच्या धैर्याला मी अभिवादन करतो. आपल्या मातृभूमीच्या रक्षणासाठी सर्वस्वपणाला लावणाऱ्या या नायकांचा देशाला अभिमान आहे, असे नमूद केले आहे.

वाळू शिल्पकार प्रयागराज यांनी कारगिल युद्धातील सैनिकांचे शौर्य दर्शवणारे वाळू शिल्प बनवून कारगिल युद्धाच्या २१ वर्षपूर्तीच्या निमित्ताने शहीद जवानांना आदरांजली वाहिली आहे.

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी कारगिल दिवस निमित्ताने दिल्लीतील विजयस्तंभ येथे जाऊन शहीद जवानांना अभिवादन केले.

भारताने पाकिस्तानविरोधात कारगिल युद्धात विजय मिळवण्याच्या घटनेला आज २१ वर्ष पूर्ण झाली आहे. १९९९ साली हे कारगिल युद्ध झाले होते. या युद्धात शहीद झालेल्या जवानांचो हौतात्म्य कधीही विसरता येणार नाही. त्यांना आजच्या दिवशी देशभरातून विविध प्रकारे श्रद्धांजली दिली जात आहे.