रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. लोकसभा निवडणूक 2019
  3. लोकसभा निवडणूक 2019 बातम्या
Written By
Last Modified: गुरूवार, 14 मार्च 2019 (09:27 IST)

पंतप्रधान होण्याची माझी योजना नाही

पंतप्रधान होण्याची ना माझी, ना संघाची योजना, अशी माहिती केंद्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांनी दिली. गडकरी यांनी पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत हे वक्तव्य केले आहे. लोकसभा निवडणुकीत एनडीएचे जरी सरकार आले तरी नरेंद्र मोदी पंतप्रधान होणार नाही, असे व्यक्तव्य राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले होते.  
 
पंतप्रधानपद ही माझी महत्त्वाकांक्षा नाही. संघाची तशी योजनाही नाही. 'अथक काम करणं' हा माझा मंत्र आहे. राजकारणात किंवा कोणतंही काम करताना आपण कोणता हिशेब ठेवलेला नाही. जिथं रस्ता मिळेल, जे काम दिसेल ते करत गेलो. देशासाठी सर्वोत्तम काम करण्यावर माझा विश्वास आहे. मी कुणाच्या जास्त जवळ जात नाही. लॉबिंग करत नाही. मनापासून सांगतो की मी या शर्यतीत नाही. मी मोदीजींच्या मागे खंबीरपणे उभा आहे. ते खूप चांगलं काम करत आहेत.