मंगळवार, 23 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By

दुसर्‍या प्रजातींची भाषाही शिकतात पक्षी

पक्ष्यांसाठी आपल्या सहवासातील जीवाचा आवाज ऐकणे व समजणे हे जीवन-मृत्यूमधील अंतरासाठीही महत्त्वाचे ठरू शकते. त्यामुळे ते अन्य प्रजातींचीही भाषा शिकून घेण्याचा प्रयत्न करतात. ते हे कसे करतात हे समजून घेण्याचा माणसाने नेहमीच प्रयत्न केला आहे. संशोधकांनी म्हटले आहे की, अन्य पक्ष्यांचे ऐकून ते त्यांच्या भाषेतील काही खुणा समजून घेऊ शकतात. ऑस्ट्रेलियातील एक छोटासा पक्षी 'फेरी रेन' जन्मतः दुसर्‍या पक्ष्यांची भाषा समजून घेऊ शकत नाहीत. मात्र, काहीविशेष आवाजाच्या खुणा ते लक्षात ठेवतात. ब्रिसल युनिव्हर्सिटीमधील बायोलॉजिस्ट अँड्र्‌यू रॅडफर्ड यांनी सांगितले की काही जीव अन्य प्रजातींच्याही भाषा शिकतात. मात्र, ते हे कसे करतात याची माहिती नव्हती. पक्ष्यांसाठी शिकण्यासाठी अनेक माध्यमं असतात. रॅडफर्ड आणि ऑस्ट्रेलियन नॅशनल युनिव्हर्सिटीमधील त्यांचे सहकारी ऑस्ट्रेलियन नॅशनल बॉटनिक गार्डनमध्ये याबाबतचे निरीक्षण करण्यासाठी फिरले. त्यांच्याजवळ पक्ष्यांच्या आवाजाच्या काही रेकॉर्डस्‌ होत्या. त्यानंतर संशोधकांनी पक्ष्यांना दोन अनोळखे आवाज ऐकवले.