रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By

पुण्यात फिरता पेट्रोलपंप

देशात पहिल्यांदाच आणि ते ही फक्त पुण्यामध्ये फिरता पेट्रोलपंप ही सुविधा सुरु करण्यात आली आहे. फ्युअल ॲट डोअरस्टेप म्हणजे एक प्रकारचा हा मोबाईल पेट्रोलपंप आहे. एका ट्रकवर इंधनाची टाकी आणि डिस्पेन्सर बसवण्यात आलाय. त्याला जीपीएस बसवण्यात आलं आहे. 
 
पुण्यातील चाकण रस्त्यावर खराबेवाडीत हा फिरता पेट्रोलपंप उभा असतो. जिथून कुठून ऑर्डर येईल तिथे हा पेट्रोलपंप चालू लागतो. सध्या केवळ जेनसेट , डीजीसेट किंवा टॉवर्ससाठीच्या इंधनाचा पुरवठा याद्वारे करण्यात येतोय. सुरवातीला विशिष्ट ग्राहकांनांच या सेवेचा लाभ मिळणार आहे. इंडियन ऑईल ही सुविधा देत आहे.