बुधवार, 1 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: शनिवार, 9 जून 2018 (00:25 IST)

अतिउत्साही चाहत्यांनी कोहलीच्या पुतळ्याचा कान तोडला

नुकताच भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीच्या मेणाच्या पुतळ्याचं अनावरण दिल्ली येथील मॅडम तुसाद वॅक्स म्युझिअममध्ये करण्यात आलं. यावेळी काही अतिउत्साही चाहत्यांनी कोहली याच्या पुतळ्याचा कान तोडला आहे.
 
या ठिकाणी वॅक्स म्युझिअममध्ये सर्व पुतळ्यांसोबत फोटो काढण्याची अनुमती असल्याने विराटचे चाहते त्याच्या पुतळ्यासोबत फोटो-सेल्फी काढू लागले. पण, तिथे येणाऱ्या प्रेक्षकांचा ओघ इतका होता की काही वेळाने विराटच्या पुतळ्याशेजारी फोटो काढण्यासाठी धक्काबुक्की होऊ लागली. या गडबडीत विराटच्या पुतळ्याचा उजवा कान तुटला.त्यानंतर संध्याकाळपर्यंत म्युझिअमच्या व्यवस्थापनाने तो कान दुरुस्तही केला.