शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: गुरूवार, 15 मार्च 2018 (15:34 IST)

फिनलंड जगातील सर्वाधिक 'हॅपी' देश

जगातील सर्वाधिक सुखी किंवा 'हॅपी' देश म्हणून यावर्षी फिनलंड देशाची निवड झाली आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या अहवालानुसार 156 देशांच्या यादीत फिनलंड देश अग्रेसर ठरला. भारत मात्र या यादीमध्ये 133 व्या क्रमांकावर आहे. विशेष म्हणजे भारताचा शेजारी पाकिस्तानही 75 व्या स्थानावर आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत पाकने पाच क्रमांकांनी आघाडी घेतली, तर भारताची मात्र घसरणच झाली आहे. चीन (86), भूतान (97), नेपाळ (101), बांगलादेश (115), श्रीलंका (116) भारतपेक्षा सरस ठरले आहेत.

फिनलंडनंतर नॉर्व, डेन्मार्क, आईसलँड, स्वित्झर्लंड, नेदरलंड, कॅनडा, न्यूझीलंड, स्वीडन, ऑस्ट्रेलिया या देशांचा टॉप 10 मध्ये समावेश होतो. अमेरिका या यादीत अठराव्या, तर इंग्लंड एकोणीसाव्या स्थानावर आहे. आफ्रिकेतील बुरुंडी हा देश समाधानी देशांच्या यादीत शेवटच्या क्रमांकावर आहे.