रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: गुरूवार, 16 ऑगस्ट 2018 (08:54 IST)

इम्रान खानच्या शपथविधी हे दोघे जाणार नाहीत

पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू इम्रान खान १८ ऑगस्टला पाकिस्तानच्या पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहे. इम्रान खान यांच्या शपथविधीसाठी भारताचे माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर, कपील देव आणि नवजोतसिंग सिद्धू यांना निमंत्रण पाठवले. मात्र  कपील देव आणि सुनील गावसकर इम्रान खानच्या शपथविधीला जाणार नाहीत. वैयक्तिक कारणासाठी आपण इम्रान खानच्या शपथविधीला जाऊ शकत नसल्याचं कपील देव यांनी सांगितलं. तर भारत आणि इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या टेस्ट सीरिजनिमित्त गावसकर इंग्लंडमध्ये कॉमेंट्री करत आहेत. त्यामुळे गावसकर यांनाही या सोहळ्याला जाता येणार नाही. याबाबत गावसकर यांनी १२ ऑगस्टलाच इम्रान खानला कळवलं आहे.
 
दुसरीकडे नवजोतसिंग सिद्धूनं मात्र केंद्रीय गृहमंत्रालयाकडे शपथविधी सोहळ्यासाठी पाकिस्तानला जायची परवानगी मागितली आहे. काँग्रेसचे नेते असलेले सिद्धू हे पंजाब सरकारमध्ये मंत्रीही आहेत. सिद्धू यांनी पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनाही याबाबत माहिती दिली आहे. कपील देव इम्रान खानच्या शपथविधी सोहळ्याला जाऊ शकत नसले तरी त्यांनी इम्रान खान आणि त्याच्या पक्षाला शुभेच्छा दिल्या आहेत