बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: गुरूवार, 8 मार्च 2018 (15:26 IST)

मुंबई विमानतळ दर्जेदार सेवा देण्यात जगात नंबर १

सर्वाधिक प्रवाशांना दर्जेदार सेवा देण्याच्या बाबतीत मुंबई छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ जगात नंबर १ ठरले आहे. एअरपोर्टस् कौन्सिल इंटरनॅशनलने (एसीआय) जगभरातील विमानतळांचे सर्वेक्षण करून ही क्रमवारी दिली आहे. वर्षाला चार कोटींपेक्षा अधिक प्रवासी मुंबई विमानतळावरून प्रवास करतात. मुंबईचे छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि दिल्ली येथील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ ही दोन्ही विमानतळे सर्वाधिक प्रवाशांना सेवा देण्यात जगात अव्वल ठरली आहेत. 

तर
२०१७ या वर्षात दीड कोटी प्रवाशांना सेवा देऊन हैदराबाद विमानतळही त्यांच्या पंक्तीत येऊन बसले आहे. एसीआयने केलेल्या सर्वेक्षणात जगभरातील विमानतळांवर प्रवाशांची मते जाणून घेतली. विमानतळावरील प्रवेश, सुरक्षाव्यवस्था, रेस्टरूम्स, रेस्टॉरंटस् आदी ३४ सेवांबाबत प्रवाशांकडून माहिती घेतली गेली. दिल्ली विमानतळ हे या सर्वेक्षणात जगातील सर्वाधिक व्यस्त २० विमानतळांमध्ये सातवे विमानतळ ठरले.