शुक्रवार, 3 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By

पिवळ्या साडीनंतर आता निळा गाऊन घातलेली पोलिंग ऑफिसर चर्चेत

लोकसभा निवडणूक आपल्या शेवटल्या चरणात आहे. या दरम्यान नेता, सभा, रॅली आणि नेत्यांचे वायफळ वक्तव्य चर्चेत आहेत. तरी यातून अगदी वेगळी चर्चा आहे पोलिंग अधिकारी यांचा फोटो. हा फोटो सध्या खूप व्हायरल होत आहे. 
निळा रंगाचा ड्रेस परिधान केलेली महिला अधिकारी यांच्याबद्दल सांगण्यात येत आहे की यांची ड्यूटी भोपाळच्या गोविंदपुरा विधानसभाच्या एका पोलिंग बूथवर लागली होती. आपल्या सहयोगीसह ईव्हीएम घेऊन जात असलेला फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.
 
या महिलेच्या हातात असणार्‍या EVM बॉक्सवर 154 नंबर अंकित आहे. हा भोपाळच्या गोविंदपुरा विधानसभेचा क्रमांक आहे.

 
तरी या महिला अधिकारीबाबद विस्तृत माहिती मिळालेली नाही. यापूर्वी उत्तर प्रदेश येथील एक महिला निवडणूक अधिकारी यांचा पिवळ्या साडीत फोटो व्हायरल झाला होता.