शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: बुधवार, 24 एप्रिल 2019 (09:33 IST)

मतदानाच्या जनजागृतीसाठी शाहरुखनचे रॅप सॉन्‍ग

देशात मतदारांमध्‍ये जागृती करण्यासाठी बॉलिवूड अभिनेता किंग खान शाहरुखने रॅप सॉन्‍ग गायले आहे. त्‍याचा या गाण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्‍हायरल होत आहे. शाहरुखने गायलेल्‍या गाण्‍याला तनिष्क बागची आणि अब्बी यांनी शब्दबद्ध केले आहे. १ मिनिटांच्‍या रॅप सॉन्‍गमधून शाहरुखने मतदान करण्याच्या अधिकाराचे महत्त्व सांगितले आहे. 
 
शेअर केलेल्‍या व्‍हिडिओला 'मतदान फक्त आपला हक्क नाही, तर ही आपली शक्ती आहे, त्या शक्तीचा वापर करा,' अशी कॅप्शन देण्‍यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या व्हिडिओची स्तुती केली आहे. मोदींनी ट्विटमध्‍ये म्‍हटले आहे....'उत्तम प्रयत्न.. देशातील नागरिक आणि विशेषकरून पहिल्यांदा मतदान करणारे लोक तुझ्या आवाहनाला चांगला प्रतिसाद देतील आणि मतदान करण्यासाठी मोठ्या संख्येने बाहेर पडतील, असा मला विश्वास आहे' असे सांगितले.