बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: शुक्रवार, 11 मे 2018 (17:14 IST)

श्रीदेवी मृत्यू प्रकरण : पुन्हा वेगळी चौकशी नाही - सुप्रीम कोर्ट

सुप्रीम कोर्टाने  आज दुबईतील हॉटेलमध्ये झालेल्या अभिनेत्री श्री देवींच्या मृत्यूप्रकरणाची स्वतंत्र चौकशीची मागणी करणारी याचिका फेटाळून लावली आहे. फिल्ममेकर सुनील सिंह यांनी  सुप्रीम कोर्टात  श्रीदेवी यांच्या रहस्यमयी मृत्यू प्रकरणाची चौकशी व्हावी अशी याचिका दाखल केली होती. या वर्षी फ्रेब्रुवारीत श्रीदेवींचा दुबईतील हॉटेलमध्ये मृत्यू झाला होता. 

श्री देवी यांचा  बाथटबमध्ये बुडून त्यांचा मृत्यू झाला होता. ५४ वर्षी अभिनेत्री श्री देवींच्या अचानक जाण्याने संपूर्ण बॉलीवूड धक्का बसला होता.   त्यांच्या अचानक मृत्यूने अनेक प्रश्न निर्माण केले गेले होते. मात्र दुबई येथील तपासाअंती त्यांचा मृत्यू बाथटबमध्ये बुडून झाल्याचे निष्पन्न झाले.  शुक्रवारी न्यायमूर्ती दीपक मिश्रा, न्यायमूर्ती एए खानविलकर आणि न्यायमूर्ती डी वाय चंद्रचूड यांच्या खंडपीठाने सुनील सिंह यांची याचिका फेटाळून लावली   आहे. त्यामुळे आता श्रीदेवी मृत्यू    प्रकरणावर पूर्ण पडदा पडला  आहे.