गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By

विदेशी पर्यटकांवर माकडांच्या टोळीचा हल्ला

ताजमहाल पाहण्यासाठी आलेल्या विदेशी पर्यटकांवर माकडांच्या टोळीने हल्ला केला. यावेळी माकडांनी दोन पर्यटकांच्या पायाचा चावा घेत त्यांना जखमी केले आहे. यात  पाहण्यासाठी परदेशी पर्यटकांचा एक जत्था येथे आला होता. काहीजण ताजमहाल समोर उभे राहून नक्षीकाम बघत होते तर अनेकजण फोटो काढण्यात मश्गूल होते. त्याचवेळी यमुना नदीच्या दिशेने अचानक आठ-दहा माकडांचे एक टोळके तेथे दाखल झाले. परदेशी पर्यटकांनी त्यांना हुसकावण्याचाही प्रयत्न केला. पण हिंसक झालेल्या माकडे त्यांच्या अंगावरच झेपावली. यामुळे काही पर्यटक खाली पडले. तर बाकीचे जीव वाचवण्यासाठी वाट दिसेल तिथे धावू लागले. हे बघून इतर पर्यटकांमध्येही भीतीचे वातावरण पसरले. बघता बघता माकडांनी काही पर्यटकांना घेरले व त्यांच्या पायाचा चावा घेतला. यामुळे काही पर्यटकांनी पुढे येऊन माकडांना हाकलून लावले व पर्यटकांची सुटका केली. त्यानंतर तात्काळ डॉक्टरांना पाचारण करण्यात आले. योग्य ते उपचार केल्यानंतर पर्यटकांना जाऊ देण्यात आले.