1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: बुधवार, 13 जून 2018 (15:07 IST)

जेठालालला भेटण्यासाठी दोन मुलांनी घरातून पळ काढला

Two children ran away
‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेतील लोकप्रिय जेठालालची भूमिका साकारणाऱ्या अभिनेता दिलीप जोशीला भेटण्यासाठी दोन मुलांनी घरातून पळ काढला. मूळचे राजस्थानमध्ये राहणाऱ्या या दोन अल्पवयीन मुलांनी जेठालालला भेटण्यासाठी मुंबई गाठली. ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेचे चाहते असून ते प्रत्येक एपिसोड पाहत असल्याची माहिती या दोन मुलांनी पोलीस चौकशीत दिली. जेठालाल आपल्याला खूप आवडत असून त्याला भेटण्यासाठी आम्ही मुंबईला पळून आलो असंही त्यांनी पोलिसांना सांगितलं.
 
‘स्पॉटबॉय ई’ या वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार आठवी आणि सहावीत शिकणारी ही दोन मुलं चुलत भावंडं आहेत. ४१०० रुपये जमा करून बसने प्रवास करत हे दोघं मुंबईला आले. मुंबईतील पवई इथल्या परिसरात ते दिलीप जोशीच्या घराचा पत्ता विचारत होते. या दोघांचं वागणं संशयास्पद वाटल्याने एका व्यक्तीने पोलिसांनी त्याविषयी कळवलं.